Nashik ST Bus Accident : नाशिकमध्ये पिंपळगाव टोल नाक्याजवळ बस आणि ट्रकची धडक, 20 प्रवासी जखमी
Continues below advertisement
Nashik ST Bus Accident : नाशिकमध्ये पिंपळगाव टोल नाक्याजवळ बस आणि ट्रकची धडक, 20 प्रवासी जखमी
पिंपळगाव टोल नाक्यावर एस टी महामंडळाच्या बसने टँकरला जोरदार धडक दिल्यानं 20 हुन अधिक प्रवासी जखमी झाले. जखमीवर पिंपळगाव बसवंत मधील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. जळगाव आगाराची बस मुंबईच्या दिशेने जात असताना सायंकाळी पाच च्या सुमारास हा अपघात घडला. ही घटना cctv मध्ये कैद झालीय. पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर भरधाव वेगाने आलेल्या बसवरचे चालकाचे नियंत्रण सुटले आणि बसने टँकरला मागून धडक दिली. बसचे ब्रेक फेल झाल्यानं चालकाचे नियंत्रण सुटल्याची चर्चा आहे. दरम्यान या टोल नाक्यावर नेहमीच कार, जीप आशा वाहनांचा रांगा असतात. बस टॅंकरवर धडकल्यानं सुदैवाने मोठा अनर्थ टळला असला तरी काही प्रवाश्यांना जबर मार लागला आहे.
Continues below advertisement