Nashik Onion Farmers : कांदा आयातीनंतर देखील नाशिकमध्ये कांद्याचे दर स्थिर
Nashik Onion Farmers : कांदा आयातीनंतर देखील नाशिकमध्ये कांद्याचे दर स्थिर
कांदा उत्पादकांसाठी आनंदाचे बातमी अफगाणिस्तानातून भारतात कांदा आयात झाल्यानंतर भारतात कांद्याचे दर कमी होतील अशी भीती व्यक्त केली जात होती..मात्र नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे भाव स्थिर आहेत... अफगाणिस्तानातून भारतात कांदा आयात केला असलेतरी कांद्याचे दर स्थिर असल्याची परिस्थिती नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये आहे... कांदा आयत करण्यापूर्वी कांद्याला जे दर मिळत होते तेच दर आता देखील मिळत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.... कांद्याचे आवक कमी असल्याने साधारण साडेचार ते पाच हजार रुपयापर्यंत क्विंटल मागे कांद्याचे दर नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळत आहे... नवीन कांदा बाजारात येण्यासाठी अजून काही कालावधी असल्याने कांद्याचे दर कमी होणार नाहीत अशी परिस्थिती नाशिकमध्ये आहे.. यात संदर्भात नाशिकचे कांदा व्यापारी हिरामण परदेशी यांच्याशी बातचीत करून अधिक माहिती जाणून घेतलीय आमच्या प्रतिनिधींनी....