Nashik Onion Farmer Loss : पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान, साठवणीतला कांदा सडला
Nashik Onion Farmer Loss : पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान, साठवणीतला कांदा सडला
Nahik जिल्ह्याला गेल्या आठ ते 15 दिवसापासून अवकाळी पावसान अक्षरशः झोडपून काढले. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणामध्ये यात नुकसान झालेला आहे. Onion , भाजीपाला, फळांच मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेल आहे. लाखो रुपयांचा शेतकऱ्यांना या अवकाळी पावसामुळे फटका बसलेला आहे. कालही मुसळधार पाऊस नाशिक शहरासह आजूबाजूच्या परिसरामध्ये झाला आणि त्यामध्ये कांदा पिकाच सर्वाधिक नुकसान झालेले आहे. आपण आता. नाशिकच्या मखमलाबाद परिसरातील आहोत जगझाप यांच्या मळामध्ये आहोत आणि आपण बघतोय की इथे कांदाच सॉर्टिंग सुरू आहे. गेल्या आठ ते 10 दिवसापासून अशाच पद्धतीने शेतातन कांदा हा बाहेर काढला जातो मात्र तो पूर्णपणे भिजलेला असल्यामुळे काही कांदा हा फेकून देण्याची वेळ येते. त्यातल्या त्यात जो चांगला कांदा आहे तो चांगला कांदा हा बाजूला केला जातोय. गेल्या काही दिवसापासून महिन्यांपासून कांद्याला बाजारभाव नाहीये. आहे ते बाजारभाव शेतकऱ्यांना परवडत नाही आणि अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय. दोन दिवसापर्यंत नाशिक जिल्ह्याचा जर एकूण आढावा घेतला तर 5 हजार हेक्टर क्षेत्रापेक्षा जास्त फटका हा नाशिक जिल्ह्यातील शेती पिकाला बसलेला आहे. युवा शेतकरी आपल्या सोबत आहेत. दादा काय चालू आहे सध्या शेतामध्ये किती नुकसान होतय? नाशिक परिसरामध्ये गेल्या 15 दिवसापासून जो पाऊस चालू झालेला आहे जो अवकाळीनी जो हैदोस माजवलेला आहे त्याच्यामुळे बऱ्यापैकी नुकसान शेतीमालाच झालेल आहे. आज सध्याच्या परिस्थितीत म्हटलं तर कांदा काढणीचे काम फार जोरात चालू आहे संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये आणि इतर राज्यामध्ये पण जसा भाजीपाला असेल, फळपिक असतील या सर्वच भाजीपाल्याचे किंवा फळपिकांच आणि नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा पिकाचे सर्वाधिक नुकसान होत आहे.