Nashik Bhoot Story : नाशकात वाहन चालकाला भुतानं मारलं? प्रकरण नेमकं काय? कुणाला दिसलं भूत?

Continues below advertisement

Nashik Bhoot Story : नाशकात वाहन चालकाला भुतानं मारलं? प्रकरण नेमकं काय? कुणाला दिसलं भूत? 
नाशिकच्या निफाड तालुक्यातील काही भागात भूत दिसल्याची अफवा पसरल्याने भीतीची वातावरण आहे.   शिरवाडे ते धामोरी  गावच्या रस्त्यावर नदीजवळ एका वाहन चालकाला भुत दिसले आणि भुताने त्या चालकाला मारहाण केली, अशी अफवा पसरली असून गावात एकच चर्चा सुरू झाली आहे.   सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असून अफवांनी आणखीच जोर धरला आहे.   व्हिडिओमध्ये रडण्याचे आवाज ऐकायला येत आहेत तर एका व्यक्तीच्या पाठीवर मारहाण केल्यानं गंभीर जखमा झाल्याचा फोटो व्हायरल होत असल्याने  नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.   या घटनेची दखल अंधश्रद्धा निर्मूलन समितीने घेतली असून नागरिकांचे प्रबोधन केले जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले फोटो आणि व्हिडीओ एडीट करण्यात आले असून कोणीतरी खोडसाळपणा करत सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवीत असल्याचा दावा केला आहे.  नागरिकांच्या मनातील भीती घालविण्यासाठी येत्या अमावस्याच्या रात्री अंनिस चे पदाधिकारी गावात भेट देऊन नागरिकांचे प्रबोधन करणार आहेत 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram