Nashik : दबा धरुन बसलेल्या बिबट्याचा हल्ला, गावकरी भयभीत
Nashik : दबा धरुन बसलेल्या बिबट्याचा हल्ला, गावकरी भयभीत. नाशिकच्या येवला तालुक्यातील धानोरे शिवारातील एका शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने माणसावर हल्ला करत पळ काढला..येवला तालुक्यातील एका शेतात बिबट्या घुसल्याचे काही ग्रामस्थांनी बघितले..तात्काळ वनविभागाला याबाबत माहिती कळविण्यात आली. वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहोचताच त्यांनी बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला..मात्र यावेळी अचानक दबा धरुन बसलेला बिबट्या शेतातून बाहेर पडला आणि येथे उपस्थित असलेल्या व्यक्तीच्या अंगावर झेप मारली यात ती व्यक्ती खाली पडून जखमी झाली..तेथून बिबट्याने ऊसाच्या शेताकडे धूम ठोकली..वनविभागाचे पथक या बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न करीत आहे..