Nashik Flood Alert | Gangapur Dam मधून विसर्ग वाढला, Godavari ला पूर, नदीकाठच्या गावांना इशारा
नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. काल मध्यरात्रीपासून नाशिकच्या धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. गंगापूर धरणातून सध्या एक हजार तीनशे साठ क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरू आहे. यामुळे रामकुंड परिसरात गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सध्या रामकुंड परिसरातील लहान-मोठ्या मंदिरांना पाण्याने वेढा घातला आहे. रामकुंड परिसरातील छोटे पूल आणि रस्त्यांवरूनही पाणी वाहत आहे. गोदावरी नदीला पुन्हा एकदा पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. जर आज पावसाचा जोर वाढला, तर गंगापूर धरणातील पाण्याचा विसर्ग आणखी वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रामकुंड परिसरात पावसाचा जोर वाढल्यास पूरस्थिती वाढण्याची शक्यता आहे. सकाळी पूजा विधीसाठी येणारे नागरिकही यामुळे विचलित झाले आहेत. आजूबाजूच्या परिसरातील बाजूपठ्ठांगन आणि वाहनतळ या भागांमध्येही पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. प्रशासनाचे कर्मचारी परिसरात उपस्थित आहेत.