Farmer Distress: 'नुकसान कसं भरुन निघणार?' 2 लाखांच्या खर्चावर फक्त ₹7650 मदत, शेतकरी संतप्त

Continues below advertisement
नाशिक (Nashik) जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना (Farmers) सरकारकडून मदत जाहीर झाली आहे, मात्र ही रक्कम अत्यंत कमी असल्याने सिन्नर तालुक्यातील (Sinnar) शेतकरी नितीन गीते (Nitin Gite) यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 'या रकमेमध्ये शेतकऱ्याचं नुकसान कसं भरुन निघणार?' असा संतप्त सवाल शेतकरी करत आहेत. जायगाव येथील शेतकरी नितीन गीते यांनी दोन एकर कांदा (Onion) लागवडीसाठी सुमारे २ ते सव्वा दोन लाख रुपये खर्च केले होते. अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले, पण सरकारच्या पंचनाम्यानंतर त्यांना केवळ ७ हजार ६५० रुपयांची मदत मिळाली आहे. या तुटपुंज्या मदतीमुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत असून, झालेल्या खर्चाच्या तुलनेत मिळालेली मदत नगण्य असल्याचे चित्र आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola