Nashik Farmer : नाशिकमध्ये द्राक्ष बागेवर कुऱ्हाड, बळीराजा हवालदिल
Continues below advertisement
नाशिक जिल्ह्यातील वेळापूर येथील शेतकरी राजेंद्र पालवे (Rajendra Palve) यांनी सततच्या पावसामुळे उद्ध्वस्त झालेली आपली चार एकरांची द्राक्ष बाग तोडली आहे. 'मागचे वर्षी पण काही झालं नाही, त्यामुळे मी आता हा बाग तोडीत आहे कारण कर्जाचा डोंगर अजून वाढत चालला आहे,' असे हताश उद्गार शेतकरी राजेंद्र पालवे यांनी काढले आहेत. गेल्या सहा महिन्यांपासूनच्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीने त्यांच्या द्राक्ष बागेचे मोठे नुकसान झाले. आधीच्या नुकसानीसाठी सरकारकडून मिळालेली साठ हजार रुपयांची मदत डिजेलच्या खर्चासाठीही पुरली नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. कर्जाचा बोजा वाढत असल्याने आणि नवीन पिकातूनही उत्पन्नाची शाश्वती नसल्याने, त्यांनी अखेर बागेवर कुऱ्हाड चालवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. या परिस्थितीत सरकारने प्रत्येक बागायतदाराला भरीव मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement