Nashik Congress : नाशिक काँग्रेसची मोर्चेबांधणी, 'वोट चोरी'विरोधात स्वाक्षरी मोहीम

Continues below advertisement
नाशिकमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पक्षाने स्वबळाचा नारा दिला असला तरी, समविचारी पक्षांसोबत आघाडीची शक्यताही कायम ठेवली आहे. काँग्रेस नेते शाहूमहाराज खैरे यांनी सांगितले की, 'स्थानिक पातळीवर जे जे विरोधी पक्षाचे सगळे जे लोक आहेत ते एकत्रितपणे या सत्ताधारी पक्षाच्या या लोकांना थांबवण्यासाठी सगळ्यांना एकत्र येणं गरजेचं आहे आणि ते एकत्र येऊन यांना आपल्याला थांबवावं लागणार आहे'. याशिवाय, निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात आणि मतदार याद्यांमधील कथित घोळाविरोधात काँग्रेसने 'वोट चोरी गद्दी सोड' या नावाने स्वाक्षरी मोहीमही सुरू केली आहे. या मोहिमेत नाशिककर आणि युवक सहभागी होत असल्याचे चित्र आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola