Nashik city Bus Stop : सलग तिसऱ्या दिवशी नाशकातील सिटी बससेवा बंद, प्रवाशांना त्रास

वाहकांनी पुकारलेल्या संपामुळे नाशिक शहरातील सिटीलिंक बससेवा आज सलग तिसऱ्या दिवशी बंद आहे. तपोवन डेपोतून एकही बस बाहेर पडली नसल्याने प्रवाशांचे मात्र हाल होतायत. वाहकांचे दोन महिन्यांचे पगार रखडले आहेत. तसेच अनेकांना साप्ताहिक सुट्टीही दिली जात नाहीये. विशेष म्हणजे नियम मोडल्यास दंडही आकारला जात असल्याचा आरोप वाहकांचा असून ठेकेदाराने आश्वासन पूर्ण न केल्याने वाहक आक्रमक झाले आहेत. सिटीलिंक कार्यालयात दोन दिवसांपासून वाहकांसोबत प्रशासनाची बैठक होतेय. मात्र कुठलाही तोडगा निघत नसल्याने हा संप मिटणार तरी कधी असाच प्रश्न आता उपस्थित होतोय. बसचे चालक रोज हजेरी लावतायत मात्र वाहकच नसल्याने बससेवा विस्कळीत आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola