Nashik Blast | Satpur मध्ये भीषण स्फोट, 8 जखमी, 3 गंभीर, 4 वर्षांच्या बाळाचा समावेश

Continues below advertisement
नाशिकच्या सातपूर परिसरात एक मोठा स्फोट झाला. झाडे तोडण्यासाठी आणलेल्या कटरच्या टँकवरून गाडी गेल्याने तो फुटला. त्यातील इंधन शेजारी विडी पेटवून बसलेल्या व्यक्तीच्या अंगावर उडाल्याने मोठा स्फोट झाला आणि आगीने भडका घेतला. या आगीत आजूबाजूच्या परिसरात असलेले सात ते आठ नागरिक गंभीररीत्या जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका चार वर्षांच्या लहान बाळाचा समावेश आहे. तसेच तीन महिला आणि चार पुरुष जखमी झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. जखमींवर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, "तिघांची प्रकृती ही चिंताजनक आहे."
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola