Nashik : नाशिकमधील कार्यक्रमात BJP MLA सीमा हिरे कोसळल्या, धनंजय बेळेंचा धक्का लागल्याचा आरोप
नाशिकमधील एका कार्यक्रमात भाजप आमदार सीमा हिरे धक्का लागल्याने खाली पडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावरून वाद उफाळून आलाय... मंत्री उदय सामंत आणि दादा भुसे फित कापून उद्घाटन करताना हा प्रकार घडला.. 'निमा' संघटनेचे अध्यक्ष धनंजय बेळे यांचाच धक्का लागल्याने त्या खाली पडल्याचा आरोप हिरे समर्थकांनी केला आहे.. तर माझा धक्का लागला नसून मी त्यांना हात देऊन आधार देण्याचा प्रयत्न केला असा दावा धनंजय बेळे यांनी केला आहे. मात्र सीमा हिरे खाली पडल्यानंतर स्वतःला सावरून कार्यक्रमातून निघून गेल्या आणि त्यांची विचारपूस न करता कार्यक्रम सुरूच ठेवल्याचा आरोप हिरे समर्थकांनी केलाय.