NASA Mars Rover Discovery | Perseverance ने मंगळावर शोधली कोरडी नदी, जीवसृष्टीच्या आशा पल्लवित!
नासाच्या Perseverance रोव्हरने मंगळावर कोरडी नदी शोधून काढली आहे. या शोधामुळे मंगळावर जीवसृष्टी होती का, या प्रश्नाच्या उत्तराच्या जवळ पोहोचल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. Perseverance रोव्हर फेब्रुवारी २०२१ मध्ये मंगळावर उतरले होते. रोव्हरचे मुख्य काम माती आणि खडकांचे नमुने गोळा करणे आहे. गेल्या चार वर्षांत रोव्हरने तीसहून अधिक नमुने गोळा केले आहेत. हे नमुने पृथ्वीवर आल्यावर मंगळावरील अभूतपूर्व माहिती मिळू शकते, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. "मंगळावर जीवन होते की नाही हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे, मात्र नासाच्या सततच्या प्रयत्नांमुळे आपण त्या उत्तराच्या जवळ पोहोचत आहोत." या खडकांमधून जीवनाचे ठोस पुरावे मिळाल्यास अवकाश संशोधन इतिहासातील तो सर्वात मोठा शोध ठरेल. त्यानंतर मंगळावर मनुष्य वस्ती करण्याचे स्वप्नही वेगाने साकार होऊ शकते. ABP Majha ब्युरो रिपोर्ट.