Narendra Modi : 70 वर्षांवरील नागरिकांना 5 लाखांपर्यंतचे उपचार मोफत, मोदींची सर्वात मोठी घोषणा!

Continues below advertisement

ब्रेकनंतर झीरो अवरमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत.. आज वर्ध्यातल्या जळगावमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा पार पडली... या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. तसंच या भाषणात पंतप्रधानांनी अनेक घोषणाही केल्या. 70 वर्षांवरील नागरिकांना ५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत करणार असल्याचं आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिलं. तसंच गेल्या दहा वर्षांत २५ कोटींहून अधिक लोक गरिबीतून बाहेर आले असंही मोदी म्हणालेत. इतकंच नाही तर आपल्या भाषणात मराठी म्हणीची आठवण करुन देत मोदींनी काँग्रेसवर टीका केलीय. तसंच काँग्रेसच्या या धोरणांमुळे शेतकरी मागास राहिल्याचा आरोपही पंतप्रधानांनी यावेळी केलाय. शिवरायांच्या भूमीवर काँग्रेसच्या पापांचा हिशेब करा असंही मोदी म्हणालेत....

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram