Narendra Modi Speech Shivaji Park : राज ठाकरेंची विनंती मान्य,शिवाजी पार्कात शब्द,मोदींचं Uncut भाषण

Continues below advertisement

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत मुंबईतील शिवाजी पार्कवर महायुतीची (Mahayuti) सांगता सभा संपन्न झाली. राज्यातील दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात आणि गर्दीच्या वातावरणात ही सभा पार पडली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी (Narendra Modi) या सभेच्या प्रथमच जाहीर सभांमधील व्यासपीठावर एकत्र आले होते. राज ठाकरेंनी आपल्या भाषणातून पंतप्रधान मोदींकडे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या, त्यामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची आपली पहिली मागणी असल्याचं राज यांनी म्हटलं. राज ठाकरेंनंतर पंतप्रधान मोदींनी नेहमीप्रमाणे मराठीतून भाषणाला सुरुवात केली. मोदींनी आपल्या भाषणात विकासाकामांचा उल्लेख करत, पुढील 2047 पर्यंतच्या भारताचे स्वप्न दाखवले. तर, नाव न घेता उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) व शरद पवार यांच्यावरही हल्लाबोल केला. मुंबईतील शिवाजी पार्कवरुन पुन्हा एकदा नकली शिवसेना म्हणत उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. तसेच, काँग्रेससह इंडि आघाडी म्हणत इंडिया आघाडीवर हल्लाबोल केला.  

इंडी आघाडीकडे काय आहे, जेवढी माणसं तेवढ्या घोषणा. इंडिया आघाडीची नजर आपल्या मंदिरांवर आहे, महिलांच्या मंगळसुत्रावर आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यानुसार तुम्ही तुमच्या मुलांना तुमची संपत्ती देऊ शकणार नाहीत, तुमच्या संपत्तीतील निम्मा हिस्सा त्यांचं सरकार घेणार आहे. व्होट जिहाद वाल्यांना ती संपत्ती देण्याचं काम ते करणार आहेत. काँग्रेसला अस्तित्व वाचवण्यासाठी ही निवडणूक लढवायची आहे. देशातील लाखो गुंतवणूकदार आज मार्केटसोबत जोडले आहेत. पण, इंडी आघाडीवाले जे कट रचत आहेत, त्यांचा उद्देश देशातील गुंतवणूकदारांचा हा विश्वास तोडण्याचं काम करत आहे, असे म्हणत इंडिया आघाडीच्या धोरणांवर व जाहिरनाम्यावर मोदींनी हल्लाबोल केला.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram