Narendra Modi Speech : आम्ही शिवरायांना मानणारे लोक आहोत...नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले...
PM Narendra Modi, Delhi : "पहिल्यांदा आमच्या सरकारमुळे एका गुर्जर मुस्लीमाला मंत्रिपद मिळालं आहे. आमच्या मंत्रिमंडळात रेकॉर्ड ओबीसी (OBC) संख्येने मंत्री आहेत.मला दक्षिण भारतात जे प्रेम, स्नेह मिळालाय. त्याचे मी शब्दात वर्णन करु शकत नाही. राजकीय पंडितांना कधी हे समजू शकणार नाही",असे मत पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांनी व्यक्त केले. दिल्लीत(Delhi) भारतीय जनता पक्षाचे (BJP) राष्ट्रीय अधिवेशन सुरु आहे. यावेळी पीएम मोदींनी (Narendra Modi) कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी ते बोलत होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले, पूर्वी पूर्वोत्तर भारताकडे दुर्लक्ष केलं जायचं,कारण तिथे जागा आणि मत कमी आहेत.आम्ही त्याचा विचार करत नाहीत. त्या भागात अनेक मंत्र्यांचे प्रवास लावले. मंत्र्यांना मायनस १५ डिग्री तापमानात राहावं लागलं. कर्तारपुर कॉरिडॉर आम्ही उघडला. शाहाजाद्यांचे बलिदान आम्ही वीर बाल दिवस म्हणून साजरा करायला सुरुवात केली. पूर्वी आमचे शीख बांधव दुर्बिणीतून कर्तारपुरचे दर्शन घ्यायचे. आज शीख बांधव तिथे जातात. गुरुग्रंथसाहिब आम्ही अफगाणिस्तान मधून आणला, असेही पीएम मोदींनी यावेळी बोलताना नमूद केले.