Narendra Modi Vidhansabha Plan : राज्यात मोदींच्या 12 ते 13 सभा होणार असल्याची सुत्रांची माहिती

Continues below advertisement

Narendra Modi Vidhansabha Plan : राज्यात मोदींच्या 12 ते 13 सभा होणार असल्याची सुत्रांची माहिती

हे ही वाचा...


हरियाणाची पुनरावृत्ती राज्यात होणार...मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे:- हरियाणामध्ये झालेल्या निवडणुकीत जो जो अंदाज दाखविण्यात आलं होत ते सर्व अंदाज फेल ठरलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं चमत्कार आणि त्यांच्या कामाची पोच पावती येथील जनतेने दिली आहे.तेथे देखील डबल इंजिन च सरकार होत आणि जनतेने त्यांना साथ दिली आहे.आत्ता राज्यात देखील हरियाणाची पुनरावृत्ती होणार असल्याचं विश्वास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं.

चंदीगड येथील शपथविधी नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा येथील निवासस्थानी जात असताना पुणे विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत विचारलं असता त्यांनी याबाबत माहिती दिली.


एकीकडे राज्यात महाविकास आघाडीने जे विकास प्रकल्प बंद केलं होते ते आम्ही सुरू केले आणि राज्यात नवीन उद्योग देखील आणले आणि राज्यात कल्याणकारी योजना देखील राबविल्या आणि लाडकी बहीण पासून ते अनेक योजना महायुतीच्या माध्यमातून राबविण्यात आल्या.आणि याची पोच पावती येत्या निवडणुकीत जनता आम्हाला नक्कीच देणार असल्याचं यावेळी शिंदे म्हणाले.

चंदीगड येथे हरियाणाचे मुख्यमंत्री यांचं शपथविधी च कार्यक्रम होत आणि यासाठी राज्यातील सर्वच मुख्यमंत्री हे हजर होते.अतिशय चांगला आणि मोठा उत्साह पाहायला मिळालं. हरियाणाच निकाल आपण जर पाहिलं तर या निकालाने सर्वच सर्व्हे आणि एक्झिट पोल फेल ठरवल आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं चमत्कार आणि त्यांच्या कामाची पोच पावती येथील जनतेने दिली आहे.आणि पुन्हा सैनी हे मुख्यमंत्री झाले आहे.आणि त्यांच्या शपथविधीला जायची संधी मिळाली याच आनंद आहे.अस यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घांद्यावर हात टाकलं होत याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारलं असता ते म्हणाले की आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्वच राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची बैठक झाली.या बैठकीत एनडीए च्या घटक पक्षाचे जेवढे राज्य आहे त्या राज्यांमध्ये विकास तसेच कल्याणकारी योजना याबाबत बैठकीत चर्चा झाली.जवळपास पाच तास ही बैठक झाली असून अशी बैठक वर्षातून दोनवेळा व्हायला पाहिजे असं सगळ्यांचं म्हणणं होत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram