Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून वंदे भारतला हिरवा झेंडा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरदृष्य प्रणालीद्वारे पुण्यातील विविध विकासकामांचे उद्घाटन आणि लोकार्पण करणार आहेत. २६ सप्टेंबर रोजी निश्चित झालेला मोदींचा पुणे दौरा पावसामुळे रद्द झाला होता. आज दुपारी पंतप्रधान मोदी ऑनलाईन उपस्थितीत राहून प्रतीक्षेत असलेला जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक ते स्वारगेट मेट्रो स्थानक या मार्गाचे लोकार्पण करणार आहेत. सकाळी 11 वाजता गणेश क्रीडा मंदिर येथे हा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे ज्याला स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थितीत राहणार आहेत. कुठल्या विकासकामांचे होणार मोदींच्या हस्ते लोकार्पण आणि उद्घाटन पाहूया - जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या पुण्यातील पहिल्या भूमिगत मेट्रोच्या प्रवासी सेवेचा शुभारंभ - स्वारगेट ते कात्रज या मेट्रो मार्गाचे भूमिपूजन - सोलापूर विमानतळाचे उद्घाटन - भिडे वाडा येथील स्मारकाचे भूमिपूजन - राज्यातील बिडकीन औद्योगिक क्षेत्र राष्ट्राला समर्पित