Narendra Modi Full Speech : 'बारशाला गेला अन् बाराव्याला आला'; मराठी म्हणीतून काँग्रेसवर हल्ला

Continues below advertisement

वर्धा - महाराष्ट्र आणि देशातील पहिल्या टप्प्यातील मतदानाला आज सुरुवात झाली असून विदर्भातील वर्धा, नागपूर, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात मतदान करण्यात आले. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पहिल्या टप्प्यातील मतदानादिवशी विदर्भात प्रचार सभेसाठी आले आहेत. वर्धा आणि अमरावती जिल्ह्यातील उमेदवारांसाठी मोदींची वर्ध्यात सभा होत असून नेहमीप्रमाणे त्यांनी महाराष्ट्रातील भूमीतून मराठीत भाषणाला सुरुवात केली.भाषणाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्राच्या आणि विदर्भातील संतांचे गुणगान गायले. चैत्र एकादशीनिमित्ताने पंढरपूरच्या विठुरायाला वंदन करतो, असे मोदींनी म्हटे. आपलं प्रेम आणि आशीर्वाद मोठ्या प्रमाणात आहेत. या सभेसाठी लोकांचा उत्साह आणि गर्दी पाहून मी भारावल्याचे मोदींनी म्हटले. मोदींनी आपल्या सभेत पुन्हा एकदा मराठी म्हणीचा वापर करुन विरोधकांना टोला लगावला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram