Narendra Kale : भंडारा उधळणाऱ्या कार्यकर्त्याला मारहाण, नरेंद्र काळे यांनी मागितली माफी
Narendra Kale : भंडारा उधळणाऱ्या कार्यकर्त्याला मारहाण, नरेंद्र काळे यांनी मागितली माफी
राधाकृष्ण विखे-पाटलांवर भंडारा उधळणाऱ्या कार्यकर्त्याला मारहाण करणाऱे भाजपचे सोलापूर जिल्हा शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी माफी मागितलीय. त्यांनी काल आंदोलक शेखर बंगाळे यांना मारहाण केली होती. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर धनगर समाजात संतापाची लाट उसळलीय. त्यानंतर धनगर आरक्षण कृती समितीने नरेंद्र काळेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. अखेर या प्रकरणी नरेंद्र काळे यांनी माफी मागत प्रकरणात पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय.