Hindi Language : त्रिभाषा समितीचे अध्यक्ष Narendra Jadhav, MNS अध्यक्ष Raj Thackeray यांची भेट घेणार
Continues below advertisement
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव (Narendra Jadhav) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यात आज सकाळी अकरा वाजता 'शिवतीर्थ' येथे महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. 'हिंदी भाषा ही इयत्ता पहिलीपासून लादू नका,' अशी स्पष्ट भूमिका राज ठाकरे यांनी वारंवार मांडली आहे. या पार्श्वभूमीवर, सरकारने पहिलीपासून हिंदी अनिवार्य करण्याच्या निर्णयाला झालेल्या विरोधानंतर ही नवी त्रिभाषा समिती स्थापन केली होती. या समितीचे अध्यक्ष म्हणून, नरेंद्र जाधव हे राज ठाकरे यांचे म्हणणे आणि पर्याय जाणून घेण्यासाठी ही भेट घेत आहेत. या भेटीनंतर समिती आपला अहवाल सरकारला सादर करेल, ज्यावर पुढील निर्णय अवलंबून असेल.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement