Narendra Giri : सीडीद्वारे नरेंद्र गिरींचं ब्लॅकमेलिंग? नरेंद्र गिरी यांनी मृत्यूआधी दोरखंड मागवला?
Continues below advertisement
Narendra Giri Death : आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी (Narendra Giri) यांचा मृतदेह संदिग्ध अवस्थेत सापडला होता. महंत नरेंद्र गिरी यांच्या अल्लापूर या येथील बाघंबरी या ठिकाणच्या निवासस्थानी हा मृतदेह सापडला असून पंख्याला लटकून त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगण्यात येतंय. त्या ठिकाणी सापडलेल्या सुसाईड नोटवरुन पोलिसांनी महंत नरेंद्र गिरी यांचा शिष्य आनंद गिरी (Anand Giri) याला अटक केली आहे. महंत नरेंद्र गिरी यांची आत्महत्या की हत्या हा वाद सुरु असताना आखाडा परिषदेतील संपत्तीचा वाद समोर आल्याने या प्रकरणाला नवं वळण लागलं आहे.
Continues below advertisement