Narendra Dabholkar Case Verdict : नरेंद्र दाभोलकर प्रकरणाचा 11 वर्षानंतर निकालाचा दिवस
Narendra Dabholkar Case Verdict : नरेंद्र दाभोलकर प्रकरणाचा 11 वर्षानंतर निकालाचा दिवस
मुंबई: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी (Narendra Dabholkar Murder Case) पुणे सत्र न्यायालय आज आपला निकाल जाहीर करणार आहे. दाभोळकर यांच्या हत्येच्या 11 वर्षांनी या खटल्याचा निकाल लागणार आहे. मात्र प्रत्यक्ष खटला 15 सप्टेंबर 2021 रोजी पुण्यातील विशेष न्यायालयात सुरू झाला होता. याप्रकरणी आपला राखून ठेवलेला निकाल शुक्रवारी 10 मे रोजी देण्यात येणार आहे.
याप्रकरणी पाच आरोपींविरोधात खटला चालवण्यात आला. ज्यात वीरेंद्र तावडे, सचिन अंदूरकर, शरद कळसकर, वकील संजीव पुनाळेकर आणि त्यांचा सहाय्यक विक्रम भावे यांचा समावेश आहे. यापैकी संजीव पुनाळेकर व विक्रम भावे हे सध्या जामीनावर बाहेर आहेत. विशेष सत्र न्यायाधीश पी.पी. जाधव काय निकाल देतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे.