Narendra Dabholkar Case : दाभोळकर हत्याप्रकरणी 11 वर्षांनी 'सुप्रीम' निकाल ; 2 दोषी, 3 निर्दोष
Continues below advertisement
गेल्या ११ वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहीलेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागलाय. डॉ. दाभोलकरांची हत्या करणारे आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना पुणे सत्र न्यायालयाने दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर या प्रकरणातले उर्वरित तीन आरोपी वीरेंद्रसिंह तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलीय. २० ऑगस्ट २०१३ रोजी सकाळी सव्वासात वाजता पुण्यात महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर दाभोलकरांवर गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली. याप्रकरणी या पाच आरोपींवर खटला चालवण्यात आला. त्याचा आज निकाल लागलाय..
Continues below advertisement