Narendra Bhondekar Vs Sunil Prabhu Exclusive | मंत्रिपदावरून नाराज, दोन्ही शिवसेनेची भूमिका काय?
Narendra Bhondekar Vs Sunil Prabhu Exclusive | मंत्रिपदावरून नाराज, दोन्ही शिवसेनेची भूमिका काय?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वातील महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार नागपूरमध्ये रविवारी पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक बड्या नेत्यांचा पत्ता कट झालाय. शिवसेनेतून (Shiv Sena) तानाजी सावंत (Tanaji Sawant), दीपक केसरकर (Deepak Kesarkar), अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्याने ते नाराज असल्याची चर्चा आहे. तर मंत्रिपद न मिळाल्याने भंडारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरेंद्र भोंडेकरांनी काल शिवसेना उपनेते पदाचा राजीनामा दिला. तर अडीच वर्षांनी मंत्रिपद मिळालं तरी नको, कार्यकर्ते म्हणजे गुलाम नव्हेत, असे म्हणत विजय शिवतारे यांनी संताप व्यक्त केला. आता शिवसेना आमदार राजेंद्र गावित (Rajendra Gavit) यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे.
राजेंद्र गावित म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी आपल्या मंत्रिमंडळामध्ये आदिवासी आमदारांना स्थान दिले आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांच्याकडे सहा आमदार असून देखील त्यांनी आदिवासी समाजातला एकही आमदार दिलेला नाही. गेल्या सरकारने देखील आदिवासी समाजाला गृहीत धरले होते. त्यामुळे आदिवासी समाजाचे अनेक प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. या समस्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर नक्कीच एक आदिवासी आमदार हा मंत्री असायला हवा होता, आणि असे वाटत आहे की जी एक जागा रिक्त आहे त्या ठिकाणी एकनाथ शिंदे हे आदिवासी आमदार मंत्री म्हणून देतील, असे त्यांनी म्हटले आहे.