Narayan Survey Special Report : नारायण सुर्वेंचा फोटो पाहताच चोराचा माफीनामा
Narayan Survey Special Report : नारायण सुर्वेंचा फोटो पाहताच चोराचा माफीनामा आणि आता बातमी आहे सुप्रसिद्ध कवी आणि पद्मश्री नारायण सुर्वेंच्या घरातील चोरीची...नारायण सुर्वेंच्या नेरळ येथील घरात चोरी झाली.. आपण ज्या घरात चोरी करतोय ते घर कवी नारायण सुर्वेंचं असल्याचं समजताच चोराला पश्चाताप झाला. चोरी केलेल्या सर्व वस्तू परत करण्याची कबुली या चोराने दिली. तसं पत्र त्याने लिहिलंय.
भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली या ओळी नारायण सुर्वेंच्या कवितेच्या आहेत.. भाकरीचा चंद्र शोधण्याचा मार्ग चुकीचा असल्याची उपरती चोराला झाली आणि त्याने आपला गुन्हा कबुल करुन सर्व ऐवज परत करण्याची हमी दिली.. आज एका प्रामणिक चोरट्याचं महाराष्ट्राला दर्शन झालंय... आता तुम्ही म्हणाल चोरटा आणि प्रामाणिक कसा काय? तर त्याचं झालंय असं की एका चोरट्यानं एका मोठ्या कवीच्या घरावर डल्ला मारला.... आणि आपण कुणाच्या घरावर डल्ला मारलाय हे कळताच त्यानं चोरलेला सगळा मुद्देमाल जसाच्या तसा परत आणून दिला... कोण आहेत ते कवी आणि चोरट्यानं नेमकं काय केलं... पाहुयात ह्या रिपोर्टमधून...