मुख्यमंत्री 'मातोश्री'बाहेर पडत नाहीत, ते कोरोना रुग्णांना कसं सांभाळणार? नारायण राणेंचा घणाघात
मुंबई : राज्यात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहे. आरोग्य व्यवस्थेवर ताण येत आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री 'मातोश्री'मधून बाहेर पडत नाही, ते कोरोना रुग्णांना कसं सांभाळणार? अशी टीका भाजप नेते नारायण राणे यांनी केली. गेल्या काही काही दिवसांपासून महाराष्ट्राला कोरोना लस पुरवठा करण्यात केंद्र सरकार दुजाभाव करत असल्याची टीका राज्य सरकार करत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते नारायण राणे यांनी पत्रकार परीषद घेत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.