Sindhudurg District Bank Election : गुलाल, फटाके, फुगडी आणि राणेंचा धूमधडाका

Continues below advertisement

Sindhudurg District Bank Election : संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीची आज मतमोजणी पार पडली. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपचं वर्चस्व दिसून येत आहेत. एकूण 19 जागांपैकी 11 जागांवर भाजपचा विजय, तर आठ जागांवर महाविकास आघाडीचा विजय झाला आहे. या निवडणूकीत अनेक दिग्गजांचं वर्चस्व पणाला लागलं होतं. परंतु, अनेकांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्याचं दिसत आहे. या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप महाविकास आघाडीला धक्का देणार की, महाविकास आघाडीचे पॅनेल पुन्हा सत्ता ताब्यात ठेवणार याकडे लक्ष लागलं होतं. आरोप-प्रत्यारोपांनी ही निवडणूक गाजली होती. त्यातच या निवडणूक प्रचारादरम्यान शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर आरोप झाले होते. त्यानंतर नितेश राणे अज्ञातवासात आहेत. अशातच आज निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये भाजपचं वर्चस्व असल्याचं दिसून आलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram