Narayan Rane on Uddhav Thackeray : आम्हाला गेट आऊट म्हणणारा उद्धव ठाकरे कोण ?

Continues below advertisement

Narayan Rane on Uddhav Thackeray : आम्हाला गेट आऊट म्हणणारा उद्धव ठाकरे कोण ? 

उद्धवची लायकी आहे का मोदीं बोलायची

उद्धव ठाकरेंवर टीका करताना नारायण राणे म्हणाले की, यांनी महाराष्ट्राची माफी मागितली नसती तर महाराष्ट्राने यांना संपवलं असतं असं उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना उद्देशून बोललं होतं. उद्धव तुझी लायकी नाही मोदींना बोलायची. तुझ्यासारखा भ्रष्ट माणूस मी बघितला नाही. एकदा एक काम करण्यासाठी याने बिल्डरकडून 3 लाख रुपये घेतले होते. आमच्या रवी शेंडगेकडून मिलिंद नार्वेकरने 3 लाख घेतले होते. आदित्य ठाकरेने 15 टक्के कमिशन घेतले. त्यामुळे यांनी भ्रष्टाचारावर बोलू नये. तू कधीही मुख्यमंत्री होऊ शकणार नाही. प्रशासन नाही, कायदा माहीत नाही, काय होणार मुखमंत्री? 

शरद पवारांनी स्वतःच्या जातीला न्याय दिला नाही

नारायण राणे म्हणाले की, आजही शरद पवार जाती-जातीमध्ये लावलावी करत आहेत. शरद पवार प्रत्येक गोष्टीत राजकारण करत आहेत. 83 वय झालं तरी स्वतःच्या जातीला न्याय देऊ शकले नाही. त्यांची प्रत्येक गोष्ट संशयास्पद आहे. पवारांनी शांततेचा संदेश दिला पाहिजे, पण ते काडी आणि पेट्रोल घेऊन फिरतात. पवार सत्तेत येणार म्हणतात, पण अजित पवार त्यांना सत्तेत येऊ देणार का? 

पुतळा पडल्यानंतर त्यावर राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन तो पुन्हा उभारण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते. पण शरद पवार आणि उद्धव ठाकरे यावर राजकारण करत आहेत असा आरोप नारायण राणे यांनी केला.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram