Narayan Rane Jan Ashirwad Yatra : जनआशीर्वाद यात्रेनिमित्त 25 ऑगस्टला नारायण राणे होमग्राऊंडवर
केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणेंचा समावेश झाल्यानंतर नारायण राणे पहिल्यांदाच सिंधुदुर्गात त्यांच्या होमपीच वर येत आहेत. शपथ विधीसाठी घेलेले राणे २५ ला सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहेत. महिन्याभरानंतर राणे जिल्ह्यात येत असल्याने यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते सज्ज आहेत. २५ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट पर्यंत नारायण राणेंची जन आर्शिवाद यात्रा सिंधुदुर्गातील प्रत्येक तालुक्यात जाणार आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यां मध्ये उत्साहाचं वातावरण आहे. सिंधुदुर्गात ठिकठिकाणी राणेंच्या समर्थकांनी स्वागताचे बॅनर चौकाचौकात लावले असून हे बॅनर लक्षवेधून घेत आहेत. कार्यकर्त्यांमधे देखील उत्साह असून शिवसेनेच्या काळात रखडलेला विकास राणे साहेबांच्या माध्यमातून पुन्हा दिसेल. कोकणचा विकास फक्त राणे साहेबचं करतील आणि कोकणचा कॅलिफोर्निया करण्याची धमक फक्त राणें साहेबांमधेच असल्याच्या भावना कार्यकर्त्ये व्यक्त करत आहेत.