Rajapur Refinery Update : राजापूर रिफायनरीबाबत हालचाली सुरु, नारायण राणेंच्या उपस्थितीत होणार बैठक
Rajapur Refinery Update : तेल रिफायनरी राजापूर तालुक्यात कार्यान्वित होण्याच्या दिशेनं हालचाली सुरू झाल्या आहेत. केंद्रीय मंत्री आणि मूळचे कोकणातले नेते नारायण राणे, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची संयुक्त बैठक राजापुरात होणार आहे. जानेवारी महिन्यात ही बैठक होणार आहे. प्रकल्प समर्थक समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांना राणेंनी दिल्लीत तशी ग्वाही दिलीये.