Narayan Rane यांना सशर्त जामीन मंजूर पण Jan Ashirwad Yatraला आज ब्रेक : ABP Majha

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाडच्या न्यायालयात रात्री उशिरा जामीन मिळाला आणि काल दिवसभर रंगलेल्या अटकनाट्याचा एक अंक संपला. पुन्हा असं विधान करू नका असे निर्देश न्यायालयानं दिलेत. आणि ३० ऑगस्ट आणि १३ सप्टेंबरला रायगड पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेशही न्यायालयानं दिलेत. राणेंना जामीन मिळाल्यानंतर राणेंच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. त्यानंतर राणे रात्री मुंबईकडे परतले. त्यामुळे त्यांच्या जनआशीर्वाद यात्रेला आज ब्रेक लागला आहे. उद्या राणे पुन्हा सिंधुदुर्गात त्यांच्या होमपीचवर यात्रा सुरू करतील. दरम्यान, जामीन मिळाल्यानंतर आता शिवसेना आणि भाजप संघर्षाचा पुढचा अंक आज भाजपच्या आंदोलनामध्ये दिसू शकतो.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola