...म्हणूनच आज काही जण 'आयत्या बिळावर नागोबा'; राणेंकडून शिवसेना, संजय राऊतांवर प्रहार
Narayan Rane Criticizes Sanjay Raut in Prahar Editorial : काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक निकालावर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून टीका करण्यात आली होती. या अग्रलेखाचा समाचार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रहार वृत्तपत्रातून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर तिखट शब्दात टीकास्त्र सोडले आहे. तसेच त्यांनी काही दाखले देत संजय राऊतांवर अनेक गंभीर आरोपही केले आहेत. तसेच काही जुने दाखले देत कोकणात शिवसेनेमुळे दहशत, खून, अपहरण, हे सर्व शिवसेनेमुळे, असं संजय राऊत यांना म्हणायचे आहे का?, असा सवालही उपस्थित केला आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane has Sharply Criticized Sanjay Raut in Editorial of Saamna) प्रहार वृत्तपत्राच्या अग्रलेखात म्हणाले की, " संजय राऊत मुळात शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनेत नव्हते. शिवसेनेचे चांगले दिवस आले तेव्हा 'सामना' वृत्तपत्र सुरू झाले तेव्हा ते शिवसैनिक झाले. आज ते जशी आमच्यावर टीका करताहेत तशी टीका 'लोकप्रभा'मध्ये असताना शिवसेनेवर करत होते, याचे पुरावे माझ्याकडे आहेत. त्यामुळे त्यांना शिवसेनेचा इतिहास पूर्णपणे माहीत नाही. कोकणात हत्या झाली त्यांची यादी छापली, त्या घटना मी शिवसेनेत असताना म्हणजे 2005 पूर्वीच्या आहेत. एखादी अपवादात्मक 2005 नंतरची असू शकते. म्हणजे, कोकणात शिवसेनेमुळे दहशत, खून, अपहरण, हे सर्व शिवसेनेमुळे, असं संजय राऊत यांना म्हणायचे आहे का?"