Narayan Rane: सेना आमदाराच्या लेकाच्या लग्नाला राणे ABP Majha

शिवसेना आणि राणे यांच्यामधल्या राजकीय संघर्षाचा नवा अंक विधिमंडळात सुरु झालेला असतानाच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना आमदार मुलाच्या लग्नाला हजेरी लावली. त्यामुळं राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला उधाण झालं आहे. नारायण राणे यांचे चिरंजीव आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना हिणवण्याची कृती केली होती. त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या आमदारांनी महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला गालबोट लागल्याचा मुद्दा विधानसभा आणि विधान परिषदेतही मांडला होता. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola