Jan Ashirwad Yatra : Narayan Rane यांना विजेचा धक्का, सुदैवाने राणेंना गंभीर दुखापत नाही

Continues below advertisement

बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी सिंधुदुर्गातून..... केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा सिंधुदुर्गात असताना त्यांना एक शॉक बसलाय. आता राणे आणि राजकारण हे समीकरण आहे. त्यामुळे तुम्हाला हा राजकीय शॉक वाटला असेल.. तर असं नाहीये. नारायण राणे यांना खराखुरा विजेचा शॉक बसलाय.  काल कणकवलीच्या शिवाजी चौकात नारायण राणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी जात असताना रेलिंग ला लावण्यात आलेल्या विद्युत रोषणाईचा त्यांना शॉक लागला. सुदैवानं राणेंना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. पण भर पावसाळ्यात कार्यकर्त्यांची ही विद्युत रोषणाची हौस किती महागात पडू शकली असती याची कल्पना मात्र यावरून येते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram