रुग्णालय कमी पडल्याने कोरोना रुग्णांसाठी रेल्वे आयसोलेशन बेड,तापमानामुळे डब्यांवर गोणपाट,कुलरचा वापर
Continues below advertisement
नंदुरबार जिल्ह्यात दिवसेंदिवस रुग्णाची संख्या वाढत शासकीय आणि खाजगी रुग्णालयात ही जागा नसल्याने जिल्हा प्रशासनाच्या वतीने आता रेल्वेची मदत घेतली आहे मात्र वाढत्या तापमानामुळे रेल्वेत तयार करण्यात आलेल्या आयसोलेशन वार्ड मध्ये रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाच्या वतीने विशेष काळजी घेण्यात आली आहे. रेल्वेच्या डब्यावर गोणपाट टाकण्यात आले त्यावर ठिबक नळीद्वारे 24 तास गोणपाट भिजत राहतात. तसेच प्रत्येक डब्यात तीन कुलरची व्यवस्था करण्यात आली. प्रशासनाने उष्णतेची दाहकता कमी करण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.
Continues below advertisement