Nandurbar Bus Accidnet: विद्यार्थ्यांची बस दरीत कोसळली, दोन मुलांचा मृत्यू

Continues below advertisement
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा-मोलगी मार्गावरील देवगोई घाटात, जळगावच्या मेहुणबारे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांच्या बसला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून ५३ जण जखमी झाले आहेत. 'अनफॉर्चूनेटली, आपण दोन मुले गमावले आहेत,' अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. बस सुमारे १०० ते १५० फूट खोल दरीत कोसळल्याने हा अपघात घडला. जखमी विद्यार्थ्यांवर अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालय आणि नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्हा प्रशासनाने सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे. या अपघाताला शाळेचे प्रशासन आणि ड्रायव्हरचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप केला जात असून, या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola