Nandkishore Chaturvedi नंदकिशोर चतुर्वेदी जवळपास दोन डझनहून अधिक कंपन्यांमध्ये संचालक : ABP Majha
Continues below advertisement
श्रीधर पाटणकरांच्या कंपनीला विनातारण कर्ज देणाऱा नंदकिशोर चतुर्वेदी जवळपास दोन डझनहून अधिक कंपन्यांमध्ये संचालक म्हणून काम करत
असल्याचं समोर येतंय. यातल्या बहुतेक कंपन्या शेल कंपन्या असल्याचा संशय आहे. विशेष म्हणजे मुंबईतल्या एकाच पत्त्यावर चतुर्वेदीच्या 19 कंपन्या
रजिस्टर्ड आहेत. कहर म्हणजे 30 मार्च 2017 या एकाच दिवशी नंदकिशोर चतुर्वेदीनं 8 कंपन्या स्थापन केल्यात. ज्यातल्या सात कंपन्यांचे पत्ते एकाच ठिकाणी आहेत. काही कंपन्या पश्चिम बंगाल, लखनौमध्येही रजिस्टर्ड असल्याचं दिसतंय. त्यामुळे या कंपन्यांचं नेमकं गौडबंगाल काय आहे याचा तपास ईडीनं
सुरु केला आहे.
Continues below advertisement