Nanded : महाविद्यालयातील वादातून तरुणांचा वस्तीवर हल्ला, गावात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात ABP Majha

नांदेड जिल्ह्यातील लहान नावाच्या गावात महाविद्यालयीन तरुणांच्या अंतर्गत वादातून काही तरुणांनी वस्तीवर हल्ला केल्याची माहिती मिळतेय. जमावानं काही घरांची तोडफोड केली असून महिला आणि लहान मुलांना मारहाण केल्याचा आरोप होतोय. गावातील महाविद्यालयीन तरुणांच्या भांडणाचे रूपांतर राड्यात झालं आणि त्यानंतर जमावानं  दगडफेक आणि नासधूस करून वस्तीवर गोंधळ घातला. पोलिसांनी आरोपींवर विविध कलमांखाली गुन्हा दाखल केलाय.  सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त लहान गावात तैनात करण्यात आला आहे. सध्या परिस्थिती  नियंत्रणात असून गावात तणावपूर्ण शांतता आहे.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola