Shivshahi Bus Accident | नांदेड आगाराहून निघालेल्या शिवशाही बसचा तेलंगाणातील कामारेड्डीत भीषण अपघात
नांदेड : येथील शिवशाही बसचा तेलंगाणा राज्यातील कामारेड्डी येथे भीषण अपघात झाला आहे. या बसमध्ये एकूण 36 प्रवासी होते, त्यापैकी 17 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. आज (शनिवारी) पहाटे बसचा भीषण अपघात झाला. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.