Nanded Rain : नांदेडच्या अनेक भागांना अवकाळी पावसाने झोडपलं
नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यासह अनेक भागाला आज सांयकाळच्या सुमारास अवकाळी पावसाने झोडपून काढलंय, अचानकपणे आभाळ दाटून आलेल्या या पावसाने नागरिकांची दाणादाण उडाली होती. काही भागात गारपीट झाल्याचे देखील सांगण्यात येतय, आजच्या या पावसामुळे गव्हू उन्हाळी ज्वारी यासह मुदखेड तालुक्यातील फुलशेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झालेय. या अवकाळी पावसाचा फटका काही अंशी हरभरा, सूर्यफूल करडईच्या पिकांना देखील बसणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे आजचा पाऊस नांदेडकरांना अपेक्षित होता, त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी काळजी घेतली होती. तरीही काही जणांना याचा फटका बसल्याचे चित्र आहे.