Nanded : एमपीएससी परीक्षेत डमी परीक्षार्थीप्रकरणी आणखी दोघे ताब्यात ABP Majha
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी परीक्षा प्रक्रियेअंतर्गत डमी परीक्षार्थी प्रकरणी आणखी पाच जणांना अटक करण्यात आलीय. नांदेड सीआयडी पथकाने दोन तोतया अधिकाऱ्यांना अटक केलीय. परभणी जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागातील पर्यवेक्षीय अधिकारी पदावर कार्यरत असणाऱ्या रवी भिमनवार आणि पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात कारकून पदावर कार्यरत असणाऱ्या संदीप पवार यांना अटक करण्यात आलीय. दरम्य़ान याच प्रकरणी सीआयडीने नांदेड जिल्ह्यातील मांडवी इथला रहिवाशी असणारा मुख्य आरोपी प्रबोध राठोड मधुकर राठोडच्या घरी CID ने झाडाझडती सुरू केली. ज्यात आरोपीच्या घरातील विविध कागदपत्रे आणि नातेवाईकांची विचारपूस केली. तर या झाडाझडती कार्यवाही दरम्यान आणखी तीन जणांना CID ने ताब्यात घेतलंय. २०१६-१७ साली डमी परीक्षार्थी बसवून भ्रष्टाचार केल्याप्रकरणी ३५ जणांवर नांदेड जिल्ह्यातील मांडवी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.