Maharahstra Flood : लातूर,नांदेड, बीडमध्ये मुसळधार; अनेक नद्यांना पूर,गावांचा संपर्क तुटला
नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागातील नदी-नाल्यांना पूर आला आहे. गोदावरी नदीलाही मोठा पूर आल्याने धर्माबाद तालुक्यातील शिरस्थोड पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. पुरामुळे शिरस्थोड पूल पाण्याखाली गेल्याने मनोर संगम, बिळेगाव आणि बामणे या तीन गावांचा बाहेरील जगाशी संपर्क तुटला आहे. या पुलावर तात्काळ बॅरिकेडिंग करण्यात आले असून पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी या पुलावर पोलिसांचा बंदोबस्तही लावण्यात आला आहे. पूरस्थितीमुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. स्थानिक प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे आणि नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.