Nanded Crime : घरासमोर कचरा टाकण्याच्या क्षुल्लक कारणावरून दोघा सख्ख्या भावांचा खून ABP Majha

Continues below advertisement

नांदेड शहरातील देगाव चाळ परिसरात कचरा टाकण्याच्या कारणावरुन दोन सख्ख्या भावांची हत्या करण्यात आली आहे. प्रफुल्ल राजभोज आणि संतोष राजभोज अशी या दोन भावांची नावं आहेत... प्रफुल्ल आणि संतोष यांचं कचरा टाकण्यावरुन त्यांच्या शेजारी राहणाऱ्या नातेवाईकांसोबत किरकोळ वाद झाला. यावेळी संतप्त झालेल्या चुलत भावाने प्रफुल्ल आणि संतोष यांच्यावर चाकूनेे वार केले.. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या भावांचा मृत्यू झालाय.. तर, या वादातील  साक्षीदारावरही चाकूने हल्ला करण्यात आल्याचं समोर आलं आहे....दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी ७ आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केलाय.. यातील तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.. तर, ४ आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत...

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram