Nanded Rain | मुखेडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, जनजीवन विस्कळीत, SDRF दाखल

नांदेड जिल्ह्यात आज पहाटेपासूनच जोरदार पाऊस सुरू झाला आहे. मुखेड तालुक्यात आज पहाटे झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे अनेक गावांमध्ये हाहाकार उडाला आहे. भिंगोली, भंडेगाव, हसनाळ, रावणगाव, भासवाडी, सांगवी, भादेव यासह परिसरातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या आपत्तीमुळे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. वृद्ध नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले असून SDRF ची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. हसनाळ गावामध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. हसनाळ आणि रावणगाव येथे काही लोक अडकलेले आहेत. इडग्याळ येथे अडकलेली कार बाहेर काढण्यात यश आले आहे. नांदेडमध्ये काल रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडत आहे, किंबहुना तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे नांदेडमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागांमध्ये पावसाचे पाणी घरांमध्ये शिरले आहे. त्यामुळे नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत आहे. SDRF ची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola