Nandedचे व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येचा कट वाळू माफियानं रचला? निनावी पत्रात खळबळ जनक माहिती

नांदेडमध्ये हत्या झालेले बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या घरी आलेल्या एका निनावी पत्रामुळे खळबळ माजलेय. या निनावी पत्रात बियाणी यांच्या हत्येच्या कटासंबंधी माहिती देण्यात आलेय. बियाणी यांच्या हत्येचा कट परभणीत बनला आणि त्यामागे एका वाळू माफियाचा हात आहे असा मजकूर या हिंदी भाषेत लिहीलेल्या पत्रात आहे. आठवड्याभरापूर्वी बियाणी यांची त्यांच्या राहत्या घरासमोर हत्या झाली होती. त्यानंतर बियाणी यांचं कुटुंब आणि नांदेडमधील व्यावसायिक दहशतीच्या छायेत आहेत.. त्यातच हे पत्र आल्यानं त्यांच्या पायाखालीच जमीन सरकली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola