Venugopal stops Nana Patole Decision : चंद्रपूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष देवतळेंच्या निलंबनाला स्थगिती
Continues below advertisement
चंद्रपूरचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांना नाना पटोले यांनी जिल्हाध्यक्ष पदावरून हटवलं होतं. या कारवाईला काँग्रेसचे महासचिव वेणुगोपाल यांनी स्थगिती दिली आहे. पटोले यांच्यासाठी हा मोठा दणका मानला जातोय, तर पटोलेंचे पक्षांतर्गत विरोधक विजय वडेट्टीवार यांची सरशी झालीये. चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विजय वडेट्टीवार आणि भाजपच्या पॅनलने हातमिळवणी करत खासदार बाळू धानोरकर यांच्या पॅनेलचा पराभव केला होता. त्यानंतर नाना पटोले यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांची जिल्हाध्यक्ष पदावरून उचलबांगडी केली होती
Continues below advertisement