Lok Sabha 2024 : Nana Patole लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, भंडारा-गोंदियातून पडोळेंना उमेदवारी
Continues below advertisement
Lok Sabha 2024 : Nana Patole लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, भंडारा-गोंदियातून पडोळेंना उमेदवारी
विदर्भातून काँग्रेसबद्दल दोन मोठ्या बातम्या आहेत. पहिली बातमी अशी की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले लोकसभा निवडणूक लढवणार नाहीयेत. तर डॉ. प्रशांत पडोळे यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचं समजतंय. प्रशांत पडोळे हे सहकार महर्षी यादवराव पडोळे यांचे सुपुत्र आहेत. मी जर निवडणूक लढवली तर मतजारसंघात अडकून जाईन, संपूर्ण महाराष्ट्रात मला लक्ष देता येणार नाही असा तर्क पटोलेंनी पक्षश्रेष्ठींना दिल्याचं कळतंय. दुसरी मोठी बातमी अशी की विजय वडेट्टीवार हे देखील लोकसभा लढवण्यास फारसे उत्सुक नाहीयेत. त्यामुळे चंद्रपूरची उमेदवारी प्रतिभा धानोरकर यांना मिळेल अशी चिन्हं आहेत,.
Continues below advertisement