Nana Patole - Devendra Fadnavis : अटल सेतूला भेगा नाहीत ; देवेंद्र फडणवीसांचं ट्वीट

Continues below advertisement

Nana Patole - Devendra Fadnavis : अटल सेतूला भेगा नाहीत ; देवेंद्र फडणवीसांचं ट्वीट मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूवर भेगा पडल्या असा दावा काँग्रेसनं केलाय. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  यांनी आज अटल सेतूवर जाऊन पाहणी केली. या सरकारला जनतेच्या सुरक्षेशी काहीही देणंघेणं नाही, खुद्द मोदी हे भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार आहेत अशी टीका पटोले यांनी केली.  अटल सेतूबद्दल पटोलेंचे दावे महाराष्ट्र भाजपनं  खोडून काढलेत. अटल सेतूला बदनाम करणं बंद करा, असे  महाराष्ट्र भाजपनं ट्वीट केले आहे.    अटल सेतूला बदनाम करणं बंद करा. यांना निर्माण करणं जमलं नाही पण  बदनाम करण्यात यांचा ‘हात’ कोणी पकडू  शकत नाही. फोटोत दिसणाऱ्या  भेगा या अटल सेतूवरील नाही हे स्पष्ट दिसतंय. कारण या भेगा अटल सेतुकडे जाणाऱ्या जमिनीवरच्या रस्त्याला  पडल्या होत्या.  तातडीने दुरूस्तीचे  काम सुरू करून ते काम  सुद्धा पूर्ण होत आलं आहे, असे महाराष्ट्र भाजपनं आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले.  अटल सेतूला तडे, नाना पटोलेंकडून पाहणी   महाराष्ट्रातला बहुप्रतिक्षित मुंबई ट्रान्स हार्बर लिंक  प्रकल्प म्हणजेच अटल बिहारी वाजपेयी स्मृती न्हावाशिवा अटल सेतू 13 जानेवारीपासून सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला आहे. परंतु अवघ्या पाच महिन्यातच पुलाला तडे गेले आहेत.  अटल सेतू उलवे  मधून सुरू होतो त्या ठिकाणी रस्ता काही प्रमाणामध्ये खचलेला  आहे. त्याची पाहणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram