Nana Patole Special Report : कार्यकर्त्याची कृती पटोलेंची स्वीकृती आणि वादाचा चिखल
Nana Patole Special Report : कार्यकर्त्याची कृती पटोलेंची स्वीकृती आणि वादाचा चिखल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले संपूर्ण राज्यात टीकेचे धनी झालेत. कारण कार्यकर्त्याच्या एका कृतीमुळे आणि नाना पटोलेंनी त्याला न अडवल्याने पटोलेंची डोकेदुखी वाढलीय... आणि यानंतर भाजप, शिंदे गट, राष्ट्रवादीने जोरदार हल्लाबोल केलाय... नेमकं काय घडलं पाहूया कार्यकर्त्यांचं नेत्यावरचं अतिप्रेम आणि नेत्यांचाही मिजास राजकारणात कसा अडचणीत आणतो, याचा अनुभव सध्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले घेतायत. अकोला जिल्ह्यात वाडेगाव इथे संत गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी पटोले गेले. मोठ्या पावसामुळे मैदानात चिखल झाला होता. चिखलातून मार्ग काढत पटोलेंनी पालखीचं दर्शन घेतलं. चिखलाने माखलेले पाय घेऊन पटोले गाडीपाशी गेले असता एका कार्यकर्त्याने पटोलेंचे पाय स्वतःच्या हाताने धुवून दिले.